आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोग:सेंट मेरीत विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांनी मांडले प्रयोग

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट मेरीज हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त भव्य कला, साहित्य, विज्ञान व क्रीडा प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. यावेळी पालक, विविध शाळेतील विद्यार्थी यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.

शनिवारी रोजी सेंट मेरीज हायस्कूल १० डिसेंबर रोजी सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त भव्य कला, साहित्य, विज्ञान व क्रीडा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन माजी विद्यार्थी आशिष मंत्री, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोना मंत्री, क्रिषी मंत्री, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, फादर इग्नेशियस प्राचार्य सेंट मेरीज स्कूल किनवट, फादर जॉन, फादर अरुण, फादर दीपक, फादर सॉलोमन, आणि सेंट मेरीज शाळेचे प्राचार्य फादर मनोज तीर्की, फादर कुलंदई राज, फादर अनिल, फादर जॉन, सिस्टर लाली, सिस्टर फिलोमिना, सिस्टर सिसिलिया यांची उपस्थिती होती.

शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व प्रेक्षकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. शालेय सर्व विषयांचे विविध प्रकारचे उपकरणे, विविध अंगी चित्रे, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत यांच्या वेगवेगळ्या साहित्यकृती, देखावे, वैज्ञानिक, ऐतिहासिक, खगोलशास्त्रीय, संगणक, क्रीडा या सर्व विषयांच्या कलाकृती प्रेक्षकांच्या आवडीचे केंद्र होते. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य कलेचे अविष्कार करून सर्वांची मने जिंकली. ४ हजार ५०० वर्षापूर्वी पृथ्वी, आकाश, तारे, जलं आणि मनुष्य यांची निर्मिती कशी झाली याची माहिती प्लानेटीरियमच्या माध्यमातून देण्यात आली त्याला सर्वांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या भव्य कला साहित्य विज्ञान व क्रीडा प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...