आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि मराठी विज्ञान परिषद यांच्यावतीने विज्ञान दिनाचे औचित्य साधून पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात २४ पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. //"ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेल- बीइंग//" या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि जीवन जगण्याचे संदर्भ या विषयानुषंगाने आपले वैज्ञानिक पोस्टर तयार केले होते. अँटिबायोटिक्स आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम, आयडेंटिफिकेशन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ नोवेल प्रोबायोटिक्स, विविध विषाणू जसे एडिनोव्हायरस, हिपॅटिटीस-सी, रोल ऑफ मायक्रोबायोटा इन ओबेसिटी अँड मेटाबोलिक डिसऑर्डर, इम्युनिटी, फूड मायक्रोबायोलॉजी अँड ह्युमन बीइंग अादी विषयावर पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. सुरेश कागणे म्हणाले, सूक्ष्म जीवाणू हे माणसाचे खरे सोबती असून अंगरक्षकाचीही भूमिका बजावतात.
मानवी पेशींच्या एकूण संख्येहून अधिक जीवाणू आणि सूक्ष्मजीव मानवी शरीरात असतात. यातील जीवाणू मनुष्याच्या प्रतिकारशक्तीमुळे निरुपद्रवी अवस्थेत असतात. काही जीवाणू उपयुक्त असतात तर काही आजाराला कारणीभूत होतात. उदा. पटकी (कॉलरा), कुष्ठरोग, क्षय हे आजार जीवाणूंमुळे होतात. काही जीवाणू आजार बरे करणारे व प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतात. औदयोगिक क्षेत्रात सांडपाणी व्यवस्थापनासाठी, चीज, योगर्ट, दही, ब्रेड आणि मद्य तयार करण्यासाठी (किण्वन) जीवाणूंचा वापर होतो. द्विदल वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू, मृत शरीराची विल्हेवाट लावणारे जीवाणू, अन्नसाखळीत महत्त्वाचा भाग असलेले, असे जीवाणूंचे प्रकार आहेत.
यासाठी सूक्ष्मजीवशास्त्राती ल संशोधन मानवाच्या कल्याणासाठी आहे. या स्पर्धेत वैष्णवी प्रभाकर तौर हिने प्रथम, जान्हवी रंगनाथ ठाकरे द्वितीय तर अनुराधा पांडुरंग डिघोळे हिने तृतीय क्रमांक मिळविला. सुमेध रमेश खरात आणि लक्ष्मण संजय तिडके यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. प्रदर्शनाचे परिक्षण डॉ. प्रियदर्शन भवरे, डॉ. वेंकट कोरेबोईनवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भूषण नाफडे, डॉ. स्वाती सुरेश पुरी, जनार्दन कळम, रोहन वर्तले आदींनी प्रयत्न केले. या स्पर्धेत एकूण २४ पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.