आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:स्काऊट गाइड्स प्रशिक्षणार्थींनी केले पारसी टेकडी परिसरात वृक्षारोपण

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत स्काऊट्स आणि गाइड्स जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २४ नोव्हेंबर कालावधीत गाइड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन स्काऊट गाइड जिल्हा कार्यालय जालना येथे करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून २३ नोव्हेंबर रोजी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. जालना येथील औरंगाबाद रोडवर समृद्धी महामार्ग जवळस्थित पारसी टेकडीवर गाइड्स व शिक्षिकांनी विविध प्रजातीचे वृक्ष लावले. याप्रसंगी जिल्हा प्रशिक्षण आयुक्त अख्तर जहाँ कुरैशी, शिबिर प्रमुख सोनिया शिरसाठ, शिबिर सहायक साधना नगराळे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...