आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:स्काऊट शिक्षकांचे चर्चासत्र

मंठा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रेणुका विद्या मंदिर येथे मंठा तालुक्यातील स्काऊट गाईड शिक्षकांचे एक दिवशीय चर्चासत्र संपन्न झाले.चर्चासत्राचे उदघाटन गटसमन्वय काशिनाथ राठोड यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य सचिन राठोड, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर बुलबुले, जिल्हा संघटक के. एल. पवार, पी. एन. बारडकर यांची उपस्थिती होती. चर्चासत्रास मंठा तालुक्यातील ४० शिक्षकांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना गट समन्वयक राठोड म्हणाले, स्काऊट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शाळेत स्काऊट गाईड पथक सुरू करून त्याचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने घेण्यात यावा. यावेळी उपस्थित शिक्षकांना स्काऊट गाईडचा अभ्यासक्रम व पथकाचे वार्षिक नियोजन, पथक नोंदणी, विविध खेळ, स्काऊट गाईड गणवेश, जिल्हा, राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रम तसेच राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्काराबाबत माहिती देण्यात आली. सूत्रसंचलन स्काऊट मास्टर ए. जी. राठोड यांनी के.एल. पवार यांनी आभार मानले. यावेळी कार्यालयीन कर्मचारी रमेश वारे, साईनाथ ठाकूरवार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...