आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात स्काऊटचा झेंडा ; जनजागृती माेहिमेचे आयोजन

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशाला जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी विलास इंगळे यांची उपस्थिती होती. त्यानंतर विविध स्पर्धेस सुरुवात झाली. त्यामध्ये देशभक्तीपर गीत सादरीकरण, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण तथा समारोप कार्यक्रम दुपारी तीन वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्काऊट गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक, कैलास दातखीळ होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आयुक्त गाईड तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगल तुपे व केंद्रप्रमुख भाऊसाहेब काकडे यांची उपस्थिती होती.

यावेळी सन २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माननीय राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील हिमालय वुड बँज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आकाश ठोके, राजेंद्र वाहुळकर, शिवाजी पाटेकर रमेश भागवत, जिल्हा संघटक के एल पवार तसेच सहाय्यक लीडर ट्रेनर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा संघटक गाईड सोनिया शिरसाठ यांना प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले. सुरुवातीला प्रमुख अतिथी जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगल धुपे व अध्यक्षीय समारोप कररतांना जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखिळ यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत जिल्ह्यातील श्री. शिवाजी हायस्कूल जालना, श्री. रंगनाथ महाराज माध्यमिक विद्यालय जालना, सरस्वती भुवन प्रशाला जालना, महाराष्ट्र हायस्कूल जालना, श्री. एम. एस. जैन माध्यमिक विद्यालय जालना, नगरपरिषद प्राथमिक शाळा मुर्गी तलाव जालना, राष्ट्रीय हिंदी प्राथमिक विद्यालय जालना, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल जालना कै. जाफराबादकर माध्यमिक विद्यालय जालना, नूतन विद्यालय जालना, आसाराम पाटील विद्यालय घाणेवाडी, श्रीमती दानकुँवर हिंदी कन्या विद्यालय जालना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपळखेडा गरड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकेफळ, जिल्हा परिषद प्रशाला स्टेशन रोड जालना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जालना, लोकमान्य विद्यालय जालना आदी शाळेतील २१५ कब बुलबुल स्काऊट गाईडने सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा संघटक के. एल. पवार, जिल्हा संघटक सोनी शिरसाट, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट व्ही बी गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती अख्तर जहाँ कुरैशी, स्काऊट मास्टर शिवाजी पटेकर, रमेश भागवत, प्रशांत हरकळ, निलेश श्रीसुंदर, के. जी. भालेराव, गजानन गिरे, संदीप इंगोले, विलास इंगळे सुरेश खरात शहादेव गाडगे, राजेंद्र वाहुळकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...