आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही फुटेज:वकिलाच्या मृत्यूप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गॅसच्या स्फोटात एका वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील अंबड चौफुली भागातील अर्चनानगरमध्ये गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली होती. किरण लोखंडे असे मृताचे नाव आहे. मृताची दुचाकी शहराबाहेर सापडल्याने या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात यावा, अशी मागणी वकील महासंघाच्या वतीने करण्यात आली होती. या अनुषंगाने तालुका पोलिसांकडून तपासाला गती दिली आहे. घटनास्थळाच्या परिसरातील महिला नागरिकांशी संवाद साधून काही सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली आहे.

किरण लोखंडे यांचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाला होता. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक घरातील गॅसला गळती लागली. त्यांची पत्नी घराबाहेर बसली होती. ते गॅस पाहण्यासाठी गेले असता अचानक स्फोट झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळाचा तालुका पोलिसांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात दुसऱ्या दिवशी मृताची दुचाकी शहराबाहेर सापडली. यामुळे या घटनेला वेगळे वळण येऊ लागले आहेङ वकील महासंघाच्या वतीने पोलिसांनी खोलवर जाऊन तपास करावा अशी मागणी ही केली होती.

बातम्या आणखी आहेत...