आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामनिर्देशनपत्र:आज सकाळी 11 वाजेपासून होणार ग्रा.पं.ची अर्ज छाननी

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्य अशा एकूण २ हजार ४४४ जागांसाठी ७७३७ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले असून सोमवारी सकाळी ११ वाजेपासून याची छाननी केली जाणार आहे. यात २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंतच्या ऑनलाईन व ऑफलाईन अर्जांचा समावेश आहे. यामुळे कोणाचा अर्ज पात्र व कोणाचा अपात्र होतो, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून पुढची राजकीय गणिते यावरच ठरणार आहेत.

चालू वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यात सरपंच पदाच्या २६६ तर सदस्यत्वासाठी २१७८ जागा आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने गत महिन्यात ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम राबवण्याचे घोषित करून २८ नोव्हेंबरपासून नामनिर्देशपत्र मागवले होते. मागील शुक्रवारी ही मुदत संपली असून ५ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार असून त्यानंतर निवडणूक चिन्ह देत अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...