आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्ची जप्त:वाढीव मावेजा न मिळाल्याने एसडीएमची खुर्ची जप्त‎

भोकरदन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎शेतजमीनीच्या वाढीव मावेजाचे‎ साडेबारा लाख रुपये न मिळाल्याने‎ भोकरदनचे उपविभागीय अधिकारी‎ अतुल चोरमारे यांची मुख्य खुर्ची व‎ इतर तीन खुर्ची जप्त करण्यात‎ आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी‎ सकाळी ११ वाजता करण्यात आला‎ आहे. दरम्यान, उपविभागीय‎ अधिकारी अतिक्रमण हटाव‎ मोहिमेत गेले होते. याचवेळी ही‎ कारवाई करण्यात आली.‎ जाफराबाद तालुक्यातील‎ अकोला देव तांडा येथील शेतकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सखाराम सवडे यांची सहा एकर‎ जमीन वर्ष २००३ मध्ये पाझर‎ तलावासाठी शासनाने संपादित‎ केली. त्या जमिनीच्या वाढीव‎ मावेजा मिळण्यासाठी वर्ष २०१६‎ पासुन त्यांनी शासनाकडे सतत‎ पाठपुरावा करूनही मावेजा मिळत‎ नसल्याने प्रकरण सह दिवाणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎ न्यायालय वरिष्ठ स्तर जालना येथे‎ दाखल केले.

त्या प्रकरणात‎ न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे‎ प्रकरणात शेतकरी सखाराम सवडे‎ यांना जप्ती आदेशातील दाखवलेली‎ रक्कम १२ लाख ४८ हजार ५४५‎ रुपये अद्याप पर्यंत न मिळाल्याने‎ भोकरदन न्यायालयाचे मुख्य बेलीफ‎ के. एल. पठाण व एस. टी. निकम‎ यांनी उपविभागीय अधिकारी‎ कार्यालयात जाऊन मुख्य खुर्चीसह‎ इतर तीन खुर्च्या जप्त केल्या. व‎ पंचनामा करून मुद्देमाल भोकरदन‎ न्यायालयात जमा केला आहे‎ यावेळी संबंधित शेतकरीही‎ उपस्थित होते. उपविभागीय‎ अधिकारी कार्यालयात खुर्ची जप्त‎ करण्याच्या कारवाई वेळी भोकरदन‎ येथील उपविभागीय अधिकारी‎ अतुल चोरमारे हे भोकरदन शहरात‎ सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव‎ मोहिमेत भेट देण्यासाठी गेले होते.‎ दरम्यान इकडे त्यांच्या कार्यालयात‎ कोर्टाच्या आदेशाने त्यांची खुर्ची‎ जप्त करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...