आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:वस्तीगृहासाठी दुसऱ्यांदा उपोषणाची वेळ, मंजूर असलेल्या सावरखेडा परिसरातील वसतिगृहाला अद्यापही मुहूर्त लागेना

जाफराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावरखेडा शिवारात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह २००७-०८ मध्येच मंजूर करण्यात आले होते. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे साल २०२२ उजडूनही वसतीगृहाच्या बांधकामाचे नारळ फुटलेले नाही.यासाठी समाज बांधवांसह विविध संघटनांनी उपोषण धरणे निवेदने देत प्रशासनाला याबाबत जागृत करण्यासाठी विविध आंदोलने केले मात्र प्रशासनाना गरीब, वंचित दलित विद्यार्थांना अशिक्षित ठेवण्याचा मानस असल्याचे यावरुन दिसुन येत असल्याचे निवेदन समाजबांधवांनी तहसिदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले.

वसतीगृह सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशी व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका घेत निर्वाणीचा इशारा समाजबांधवांनी प्रशासनव लोकप्रतिनिधींना दिला आहे. तसेच जिल्ह्यात सर्व तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतीगृह आहेत. मात्र, जाफराबाद तालुक्यातील वसतीगृह अजूनही होत नाही ही मोठी शोकांतिका असुन तालुका तेथे वसतीगृह हे शासनाचे धोरण फक्त कागदावरच आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे परंतु आता जोपर्यंत वसतिगृहाचा विषय व इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही व होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची राहील तर येणाऱ्या ४ एप्रिल सोमवार पासुन तहसील कार्यालय आवारात संविधान अंमलबजावणी आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची नोंद प्रशासनाने घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. यावेळी राहुल गवई, किरण सोनुने, आकाश हिवाळे, अतुल जाधव, अशोक म्हस्के, भीमजयंती चे अध्यक्ष अमोल आढावे, अमोल गायकवाड, भूषण जाधव यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...