आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविषाणुमुळे होणाऱ्या गोवर या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी येत्या १५ ते २५ जानेवारीदरम्यान लसीकरणाचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. आरोग्यविभागाकडून पुर्वतयारी करण्यात आली असून यासाठी शहर व गावात आरोग्य पथके नेमली जाणार आहे. जिल्ह्यात ज्या बालकांना गोवर-रुबेलाचा पहिला व दुसरा डोस दिला गेला नाही, त्यांच्यासाठी १५ ते २५ डिसेंबरदरम्यान विशेष लसीकरण अभियान राबवण्यात आले.
आता दुसरी फेरी १५ ते २५ जानेवारी या कालावधीत नियोजित आहे. नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार गोवर रुबेलाचा लसीचा पहिला डोस ९ महिने ते १२ महिने तर दुसरा डोस १६ महिने ते २४ महिने या वयात घेणे आवश्यक आहे. एक किंवा दोन्ही डोसपासून बालक वंचित असल्यास पाच वर्ष वयापर्यंत २८ दिवसाच्या अतंराने हे दोन्ही डोस देता येवु शकतात. यामुळे आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रास भेट देवुन बालकाचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी केले आहे.
गोवर रुबेलाची लक्षणे
ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल व सपाट पुरळ ही गोवर रुबेलाची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्यकर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्गही होवू शकतो, यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.