आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कपाशी - तुरीच्या शेतातून गांजा जप्त

जाफराबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निवडुंगा परिसरात कापूस व तुरीच्या शेतात घेतलेल्या गांजाच्या पिकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकुन १४ लाख ६४ हजार ५५० रूपये किंमतीची ६९ गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

याप्रकरणी अवैधरीत्या गांजाची शेती करणाऱ्या इसमावर एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, तहसीलदार स्वरूप कंकाळ, अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...