आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:पुणे जिल्हा महिला क्रिकेट संघात परतूर येथील आरती मुकेची निवड

परतूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हा महिला क्रीडा संघाची नुकतीच निवड करण्यात आली असून या संघात मूळची परतूर येथील रहिवाशी असलेल्या आरती भाऊसाहेब मुके या नवोदित खेळाडूची निवड करण्यात आली आहे. आरती मुके ही सध्या सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स आंबेगाव येथे शिक्षण घेत आहे.

२६ व २७ नोव्हेबर रोजी सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ, जिल्हा क्रीडा विभाग कमिटी व सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स नरे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला क्रिकेट सामने पार पडले. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ खेळाडूंची जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. परतूर सारख्या ग्रामीण भागात क्रिकेटचे धडे घेऊन जिल्हा पातळीवरून थेट सिंहगड कॉलेज पुणे व आता पुणे जिल्हा क्रीडा विभाग महिला क्रिकेट संघात आरतीची निवड झाली.

आरतीच्या या यशाबद्दल सिंहगड कॉलेज पुणेचे प्राचार्य डॉक्टर मगन घाटोळे, क्रिडा संचालक प्रा. संतोष नवले, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विभावरी दिक्षित, १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे महाराष्ट्र निवड समितीचे सदस्य तथा प्रशिक्षक राजू काणे, परतूरचे क्रिडा प्रशिक्षक संतोष शर्मा, प्रा. डॉ. भागवत नाईकनवरे, डॉ. संदिप चव्हाण, प्रा. डॉ. पांडुरंग नवल, राजकुमार भारुका, योगेश बरिदे, आशिष गारकर, अशोक तनपुरे, शाम बरकुले, रंजित इंगळे यांच्यासह परतूर शहरातील शिक्षक, खेळाडू आदींनी आरती मुके हिचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...