आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:गणपती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेत भोकरदन येथील श्री गणपती इंग्लिश/मराठी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात वर्चस्व राहिले असुन या शाळेतील खेळाडूंनी विविध वयोगटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१४ वर्षांखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघात कर्णधार करण मोरेच्या नेतृत्वाखाली शिवाजी काळे,सोएब तडवी, रिहाण तडवी, आमन तडवी, रामेश्वर सोनवणे या खेळाडूंचा समावेश आहे. १७ वर्षीय मुलांच्या कुस्ती स्पर्धेत सचिन तुळशीराम मेंगाळ, १४ वर्षीय गट मधून करण संतोष मोरे या मल्लाची,१७ वर्षीय वयोगटातील मुलांच्या धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेत ओम मधुर तळेकर, १४ वर्षीय गटातील मुलांच्या मैदानी खेळात गोळाफेकमध्ये करण संतोष मोरे, १०० मीटर धावणे मध्ये तो द्वितीय व ८० मीटर अडथळा शर्यतमध्ये तो प्रथम आला आहे, तर थाळीफेकमध्ये शिवाजी कडुबा काळे द्वितीय आला आहे.

विजयी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मंजूषा देशमुख, इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, केंद्रप्रमुख आर. एच. सोनवणे, कृष्णा जंजाळ, आर. आर. त्रिभुवन, जे. आर. सपकाळे, सोपान सपकाळ, गौतम खाडे, अशोक नवगिरे, सुरेश भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...