आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:आसाराम पाटील विद्यालयाच्या काेमल, श्यामल यांची विभागीय पातळीवर निवड

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाराम पाटील विद्यालय घाणेवाडी येथील श्यामल गाडेकर तसेच कोमल वैद्य या क्रीडापटूंनी नुकत्याच पार पडलेल्या मार्शल आर्टच्या प्रकारात प्रथम येत गोल्ड मेडल पटकावले. या विद्यार्थिनींना औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत स्थान मिळाले आहे.

जिल्हास्तरीय मार्शल आर्ट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातील शालेय विद्यार्थ्यांनी विविध गटात सहभाग नोंदवला. या स्पर्धेत आसाराम पाटील विद्यालय घाणेवाडीच्या दोन विद्यार्थीनींनी गोल्ड मेडल पटकावत विभागीय पातळीवर आपले स्थान निर्माण केले. श्यामल शिवाजी गाडेकर या विद्यार्थिनीने शिकाई मार्शल आर्ट यामध्ये १९ वयोगटांतर्गत प्रथम येत गोल्ड मेडल पटकावले असून तिची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. तर काेमल बजरंग वैद्य या विद्यार्थिनीने उशू या स्पर्धेत १९ वयोगटांतर्गत प्रथम येत गोल्ड मेडल पटकावले असून तिची निवड विभागीय पातळीवर निवड झाली आहे. निवड झालेल्या या विद्यार्थीनींचा आसाराम पाटील विद्यालय घानेवाडीच्या प्राचार्या रेखा रनपिसे, प्रशिक्षक अभिजित कावले, जिल्हा क्रीडाधिकारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...