आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायस्कूलची निवड:जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री गणपती इंग्लिश हायस्कूलची निवड

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मध्ये पार्थ सैनिकी स्कूल खरपुडी येथील १४ वर्षीय मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री गणपती इंग्लिश हायस्कूल भोकरदन चा संघ जिल्हास्तरावर पहिल्या क्रमांकावर संघ कॕप्टन करण मोरे, व खेळाडू रिहाण तडवी, शिवाजी काळे,आमण तडवी, रामेश्वर सोनवणे, शोएब तडवी यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे अटीतटीच्या अंतीम सामन्यात विजयी झाल्यामुळे या संघाची विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा साठी निवड झाली आहे.

१४ वर्षीय मुलींच्या स्पर्धेत शाळेच्या संघाने कप्तान निशा अहिरे, अंजणी पाडळे,आर्शिन तडवी,खुशी सपकाळ, शिवाणी पाडळे,दिव्या भोटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक मिळवला. या दोन्ही विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपाध्यक्ष राजुशेठ जैन, सचिव अमृतराव देशमुख, कोषाध्यक्षा तथा नगराध्यक्षा सौ मंजुषाताई देशमुख, संचालक अनिल देशपांडे, इंद्रजीत देशमुख यांनी अभिनंदन केले. विजयी दोन्ही संघाचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य आर. आर. त्रिभुवन, जे. आर. सपकाळे, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, रोशन देशमुख, क्रीडा शिक्षक गौतम खाडे, अशोक नवगिरे,सुरेश भोसले, ज्ञानेश्वर तोटे,रामदास गिरी,सतीश दळवी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...