आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा:सिद्धार्थच्या खेळाडंूची विभागीय स्तरावर निवड

जाफराबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जालना तथा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कराटे, कॅरम, बॉक्सिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कराटे स्पर्धेमध्ये अक्षय दाभाडे, अब्दुल जाकेर सय्यद, रितेश खरसन यांनी आपल्या वजन गटात यश संपादन केले. कॅरममध्ये कार्तक पठाडे, इशिका मेठी व बॉक्सिंगमध्ये गोपाल बनसोडे यांनी अजिंक्य पद पटकावले या सर्व खेळाडूंचे विभागीय स्तरावर निवड झाली आहेत हे खेळाडू जालना जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.

तसेच जिल्हास्तरावर व्हॉलीबॉल कुस्ती, बुद्धिबळ, फुटबॉल, मुली क्रिकेट, योगदान खो-खो इत्यादी खेळाची निवड झालेली आहे.या यशाबद्दल सिद्धार्थ महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, सचिव सिनेट सदस्य प्रा. राहुल म्हस्के, प्राचार्य डॉ. श्याम सर्जे, उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. रमेश देशमुख, उपप्राचार्य विनोद हिवराळे, जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यासागर, रेखा परदेशी, मोहंमद शेख वाबळे व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनीने खेळाडूंचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. या सर्व यशस्वी खेळाडूना प्रा. वाहेद पटेल, प्रा. डॉ. कृष्णा जावके. प्रा. उदय वझरकर यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...