आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:आदिवासी आदर्श ग्रामविकास योजनेत सुंदरवाडी गावाची निवड

धावडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्रामविकास योजनेंतर्गत भोकरदन तालुक्यातील सुंदरवाडी गावाची निवड करण्यात आली आहे. या गावची पाहणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद येथील पथकाने केली. या पथकात सहाय्यक प्रकल्प अधिकारी वायाळ, बांधकाम अभियंता शेजोळ, पाणीपुरवठा अभियंता पाकळ, गटविकास अधिकारी सुरडकर, विस्तार अधिकारी पि. डब्ल्यु. सोनोने, केंद्रीय मुख्याध्यापक जे. वाय. सय्यद, सुनील पडोळ आदींचा समावेश होता. या पथकाने गावाची पाहणी करून सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामसभा घेऊन आराखडा तयार केला.

आवश्यक ती कामे प्राधान्यक्रमाने तत्काळ मंजूर करण्यात येतील, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वायाळ यांनी सांगितले. यावेळी सरपंच सौवंदरबाई गवळी , उपविभागीय अभियंता मनिष गवळी, ग्रामपंचायत सदस्य भगवान गवळी, रमेश सुरडकर, वैशाली गवळी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...