आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:विवेकानंद शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

वाटूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा केंद्र संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत विवेकानंद सेवा केंद्राच्या श्रद्धा वायाळ, अर्णव अकात, व्यंकटेश मालपाणी यांची विभागीय पातळीवर खेळण्यात येणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. शेषराव बाहेकर, संदीप बाहेकर, संगीता शिंदे, बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष नागोजी चिल्कवार, समाधान डोंगरे, प्रमोद राठोड, विकास काळे, श्रीपाद तरासे, नीलेश सरदार, परिमल पेडगावकर दिगंबर लिपणे आदींनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...