आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने राज्य क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप येत्या २५ डिसेंबर रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे होत असून यात २०, १८ व १६ वर्षाखालील खेळाडू सहभागी होऊ शकतात. तसेच आंतरजिल्हा राष्ट्रीय स्पर्धा बिहारमधील पटना येथे होणार असून १४, १६ वर्षाखालील मुले व मुली यात सहभाग नोंदवू शकतात. या दोन्ही स्पर्धेसाठी ११ डिसेंबर रोजी निवड चाचणी होणार आहे.
जालना शहरातील जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी येथील प्रांगणात होणाऱ्या निवड चाचणीत जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हा असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. बाबू यादव, प्रमोद खरात, एकनाथ सुरुसे, संतोष मोरे, विकास काळे यांनी केले असून अधिक माहिती व संपर्कासाठी ९४२३१५७८५३ यावर पी. जी. खरात यांच्याशी संपर्क करावा. तसेच खेळाडूंनी येताना मूळ जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड सोबत आणावे असेही संयोजकांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.