आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यतिथीनिमीत्त‎ स्मृतींना उजाळा‎:स्व. अण्णासाहेब जावळे यांचा मराठा‎ आरक्षणासाठी मोलाचा लढा : पाचफुले‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठ्यांचे क्रांतीसुर्य, अखिल‎ भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे‎ संस्थापक स्व. अण्णासाहेब जावळे‎ पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त‎ अभिवादन करण्यात आले. आज‎ आरक्षणाच्या लढाईसाठी तरुणांना‎ स्व. जावळे पाटील यांचा संघर्ष‎ सदैव चेतना देत राहील अण्णा‎ साहेबांच्या आठवणींना उजाळा देत‎ अण्णासाहेबांचे मराठा आरक्षण प्रति‎ व सामाजिक चळवळीमध्ये मोलाचे‎ योगदान असल्याचे शिवसेना‎ शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांनी या‎ प्रसंगी व्यक्त केल्या.

जालना‎ शहरातील पाचफुले फार्म हाऊस‎ येथे झालेल्या अभिवादन‎ सोहळ्यास जगन्नाथ काकडे‎ पाटील, संदीप ताडगे, शुभम टेकाळे‎ पाटील, राधेशाम पवळ, रोहित‎ देशमुख , रामा भुतेकर, खांडेभराड‎ राम यांची उपस्थिती होती. शिवसेना‎ शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांनी‎ स्व. अण्णासाहेब जावळे पाटील‎ यांचा शेवटपर्यंत मराठा आरक्षण‎ लढाई साठी असलेला संघर्ष,त्यांनी‎ केलेली लक्षवेधी आंदोलने‎ तरूणांना सदैव चेतना देत‎ राहतील.

अ.भा.छावा अण्णासाहेब‎ जावळे लातूर जिल्हाअध्यक्ष‎ असताना विष्णू पाचफुले हे जालना‎ जिल्हाध्यक्ष होते आणि सोबत‎ मराठा आरक्षण लढ्याचे काम‎ सोबत केले असे सांगून मराठा‎ समाजास आरक्षण मिळणे हीच‎ त्यांना खरी आदरांजली ठरेल असे‎ विष्णू पाचफुले यांनी नमूद केले.‎ तसेच जगन्नाथ काकडे पाटील‎ यांनीही स्व. अण्णासाहेब जावळे‎ पाटील यांच्या स्मृतींना उजाळा‎ दिला.‎

बातम्या आणखी आहेत...