आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंशासन दिन:फुले विद्यालयात स्वयंशासनदिनी सायली मुख्याध्यापिका

अंबड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्याच्या वतीने स्वयंशासन दिनाचे आयोजन केले होते. मुख्याध्यापक म्हणून सायली खरात हिने कामकाज पाहिले.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र खरात म्हणाले, यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते. नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेतानाच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते.

स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव आनंद वाढवणारा असतो. शिक्षक म्हणून मुलांनी दिवसभर अध्यापक ते शालेय कामकाजाची पाहणी केली. प्रास्ताविक मनोहर पटेकर तर सूत्रसंचालन विलास जाधव यांनी केले. या वेळी नितीन निचळ, मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, वाल्मिक निंबाळकर, आसाराम भद्रे, मुरली सहारे, विठ्ठल खरात, विलास जाधव, प्रशिक खंडारे, प्राजक्ता धनवे,किशोर राहटगावकर, लहू जाधव व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...