आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहा ते बारा या वयोगटातील मुलांमधील सेल्फी वेड हे सौंदर्यप्रसाधने उत्पादक कंपन्यांच्या पथ्यावर पडले आहे. ठरावीक सौंदर्यप्रसाधनांचा वापर हा अतिशय वेगाने वाढला आहे. वयात येणारी मुले फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप आदी समाजमाध्यमावर सेल्फी व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत असतात. आपण चांगले दिसावे यासाठी ही मुले मुलींप्रमाणेच सजग असतात. या वयात आवश्यक असणारी सौंदर्यप्रसाधने मुले मोठ्या प्रमाणात वापरताना दिसत आहेत.
सौंदर्यप्रसाधने उत्पादक कंपनी पौंगंडावस्थेत अवस्थेतील मुलांना मुरूम, पुटकुळ्या, वांग व काळे डाग यासारख्या त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी मुले विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. त्या सौंदर्यप्रसाधनांच्या खरेदीसाठी वायफळ खर्च करतात. सोशल मीडियावरील फोटो कोण किती सुंदर दिसतो याची तर जणू स्पर्धाच लागली आहे. मेकअपचा प्रचार करणाऱ्या इन्स्टाग्राम आयकॉन्सनी तर यात हातभारच लावला आहे. लहान मुलांना मोठ्या प्रमाणे चालण्या बोलण्यास लावले जात आहे. याचे प्रमाण आता खूप वाढले आहे.
दिसण्याच्या बाबतीत मुलीच नव्हे तर मुलंसुद्धा अतिशय तक्ष असतात. तेही हेअर जेल व डीओ वापरतात. वाढत्या सोशल नेटवर्किंगच्या या कनेक्टेड युगात चांगले दिसणे फारच महत्त्वाचे ठरत आहे. परफ्यूमचे विविध ब्रँड तर युवकात लोकप्रिय आहेत. युवकात चेहऱ्याला लावण्याच्या क्रीमचे पण विविध ब्रँड लोकप्रिय आहेत. परंतु यांच्या अतिवापराने मुलांना स्किनच्या प्रॉब्लेमांना सामोरे जावे लागत आहे. मुले हेअरस्टाइल इतरांपेक्षा वेगळी दिसावी म्हणून वेगवेगळे रासायनिक हेअर कलर वापरत आहेत. यामुळे त्यांना केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मुली तर आता १५-१६ वर्षाच्या होण्याआधीच स्किन क्रीम, फेस वाश, मेकअप फाउंडेशन, कलर कॉस्मेटिक्स, आणि हेअर कलर वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्या कोवळ्या त्वचेवर समोर चालून विविध दुष्परिणाम होण्याची संभावना आहे. समाजमाध्यमाद्वारे प्रदर्शित होणाऱ्या विविध जाहिरातींमुळे तर या सौंदर्यप्रसाधनांची विक्री कमालीची वाढली आहे. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये जाणवणारा हा बदल आता तीर्थपुरीसारख्या छोट्या शहरातही दिसू लागला आहे. भविष्यात या प्रकारांमध्ये वाढ होणार असल्याचे ग्रामीण भागातही दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.