आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

- फळ अनन्यसाधारण:स्वार्थाने केलेल्या सेवेला फळ नाही

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवा - मग ती कोणत्याही प्रकारची असो - फळ अनन्यसाधारण असेच आहे. साधूंची सेवा करण हे उत्तम उदाहरण आहे. साधूंच्या सेवेसारखं फळ नाही. सेवा अवश्य करावी, पण त्यात स्वार्थ नसावा. स्वार्थ ठेवून केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही, असा हितोपदेश डॉ. गौतममुनी मसा यांनी केला.

गुरुगणेश भवनात पर्युषण महापर्वातील प्रवचनादरम्यान ते बोलत होते. साधुजीवन हा खडतर प्रवास आहे. या प्रवासाचे धनी जे कुणी होतील त्यांनाच ते कळतं. परंतु अशा साधूंची सेवा करणं हा आपण आपला परमोच्च धर्म समजला पाहिजे. शास्त्रात ज्या गोष्टींचे वर्णन पूर्ण किंवा परिपूर्ण असे करण्यात आले आहे, त्या सर्वच गोष्टी पूर्णार्थाने परिपूर्ण आहेत, असे नाही. सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता असल्यामुळे सृष्टीतील सर्व प्राण्यांनी आपल्याला पूर्ण अधीनता दाखवावी, अशी अपेक्षा करण्याचा त्याला हक्क आहे.

विवेकशील बुद्धीने केलेले कार्य सन्मार्गाला लागते. जे कार्य सन्मार्गाला लागते, ते कधीही लोप पावत नाही. गोरगरिबांची केलेली सेवा व्यर्थ जात नाही. सेवेचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. भुकेने व्याकूळ असलेल्यांची सेवाही करता येते. अशी सेवा अनेक जण करत असतात. अन्नदान हेसुद्धा उत्तम प्रकारचे दान आहे. दानाची सेवा आपल्या हातून घडणं हीसुद्धा चांगली बाब आहे. सेवा - मग ती कोणतीही असो - मनुष्याने सेवेत राहिले पाहिजे, असेही डॉ. गौतममुनीजी यांनी सांगितले. तत्पूर्वी वैभवमुनीजी मसा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रवचन प्रभावक दर्शनप्रभाजी, गुलाबकंवरजी, हर्षिताजी यांच्यासह श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे आजी-माजी पदाधिकारी, श्रावक-श्राविकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...