आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा पूर्वसूचना न देता तोडण्यात येत असून सक्तीच्या या वसुलीच्या विरोधात तिडी पिंपळगाव येथील शेतकरी हरिभाऊ पोंढे शेतकऱ्यासह उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले पोंढे यांनी वीज वितरणचे उपविभागीय अधिकारी दशरथ तेलंगरे यांना निवेदन देऊन विजेच्या तोडी प्रकरणी २९ जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार ३७२३.७१ कोटी रुपये शासनाच्या वित्त विभागाने दिलेले असताना आणि या निर्णयाची दखल न घेता अथवा शेतकऱ्यांना नोटीस न देता विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा सपाटा लावला आहे.
या निवेदनात शेतकऱ्यांनी वापरलेली वीज, सरकारने भरलेली रक्कम आणि शेतकऱ्यांना भरावाचे रक्कम याचा हिशोब देण्याची मागणी देखील केली आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांची उपोषण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.