आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सेलू पोलिसांनी केला गुटख्याचा साठा जप्त; तीन जणांवर गुन्हा दाखल

सेलू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू शहरात मागील काही दिवसांपासून गुटख्याची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत आहे. सेलू पोलिसांनी १ डिसेंबर रोजी तालुक्यातील आहेर बोरगाव येथे छापे मारून ७४ हजार ६२८ रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलू तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणात राजरोस तस्करी व विक्री होत आहे. पोलिसांचे धाडसत्र सुरू असतानाही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

१ डिसेंबर रोजी तालुक्यातील आहेर बोरगाव येथे पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापा मारला. या वेळी शेख आरेफ खलील, गणेश केंदेर आणि धर्मराज सुपेकर यांच्याकडे गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी दुचाकीसह एकूण ७४ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाेलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक जटाळ, पो.ना. पवार, पो.ह. ज्ञानेश्वर जानगर यांच्या पथकाने पार पाडली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...