आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महाविद्यालयांनी २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा उपस्थिती अहवाल ५ एप्रिलपर्यंत या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. संबंधित महाविद्यालयाने उपस्थिती सादर केल्यास त्या विद्यार्थ्यांना त्या वर्षाचा वार्षिक १२ महिन्यांचा लाभ देता येणार आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जात व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, मंत्रालय यांच्याद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजुनही सुरू असल्याने या योजनेंतर्गत लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी दिनांक ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभराचा लाभ देण्यात येतो. महाविद्यालयाच्या २०२०-२१ मधील स्वाधार योजनेअंतर्गत सादर केलेल्या अर्जांची वार्षिक उपस्थिती महाविद्यालयाने देणे आवश्यक असून संबंधित महाविद्यालयाने उपस्थिती सादर केल्यास त्या विद्यार्थ्यांना त्या वर्षाचा वार्षिक १२ महिन्यांचा लाभ देता येणार आहे.
योजनेच्या पात्रतेसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक
आयुक्तालयाच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती ७५ टक्के आवश्यक असुन याबाबत संबंधित संस्थेचे विहीत नमून्यातील उपस्थिती पत्रक सादर करुन कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सर्व शैक्षणिक संस्था महाविद्यालय बंद करण्यात आले असले तरी सन २०-२१ व सन २१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु होते या कालावधीतील संबंधित विद्यार्थ्यांची वार्षिक उपस्थिती महाविद्यायाने ५ एप्रिलपर्यंत या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.