आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घ आजाराने निधन:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुलकर्णी यांचे निधन

अंबड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष भवानीदास ऊर्फ बाबुराव कुलकर्णी (७८) यांचे मंगळवारी दुपारी आपल्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी सकाळी ११ वाजता भालगाव रोडवरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक येथे १९ सप्टेंबर १९४४ रोजी त्यांचा जन्म झाला. वडील काँग्रेसचे माजी आमदार कै. भालचंद्रराव कुलकर्णी यांच्या काळात अंबड येथे स्थायिक झाले.

बातम्या आणखी आहेत...