आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कायद्यात कुणीही परिपूर्ण नाहीच असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जी. एच. लाहोटी यांनी केले

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायदा हा असा विषय आहे की छापील पुस्तके आणि दैनंदिन रोज माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेले न्यायनिवाडे, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जुने कायदे बरखास्त करून नवनवीन कायदे, परिपत्रके हे कायदे मंडळ हे कायद्याच्या कक्षेत आणून निर्माण करीत असतात.

म्हणून कायद्याच्या क्षेत्रात कुणीही परिपूर्ण नसतो असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जी. एच. लाहोटी यांनी केले. जिल्हा वकील संघाच्या सभागृहात नुकताच महाराष्ट्र राज्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा वतीने ठाणे-मुंबई येथे अॅड. लाहोटी यांचा दिवाणी कायद्यांचे अभ्यासक, मराठवाडा विभागातील ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले, तर व्यासपीठावर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रामेश्वर गव्हाणे, अॅड. परमेश्वर गडगिळे, अॅड.भारत ससाणे, अॅड. मयूर ढवळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. दीपक कोल्हे, अॅड. सरिता मंत्री, अॅड. सुनील किनगावकर, अॅड. संजय देशपांडे, अॅड. विष्णुपंत नाईक, अॅड. अरविंद मुरमे, अॅड. एम. बी. लिंगायत, अॅड. एस. जी. राठी, अॅड. डि.के. कुलकर्णी, अॅड. राहुल चव्हाण, अॅड. संजय काळबांडे, अॅड. गजानन मांटे, अॅड. प्रविण लाहोटी, अॅड. प्रवीण मुळे, अॅड. रवींद्र डुरे, अॅड. दशरथ इंगळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. सुजित मोटे यांनी तर अॅड. वैशाली कुलथे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...