आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यातील वरिष्ठ वेतनश्रेणी; निवडश्रेणीसाठी 730 शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देणे सुरू

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 जूनपासून प्रशिक्षणाला सुरुवात, जिल्ह्यात डायटच्या माध्यमातून नियोजन

जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण हाती घेण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील ७३० शाळांची यासाठी निवड झाली आहे. १ ते ३० जूनदरम्यान हे प्रशिक्षण होणार आहे.

रमाकांत काठमोरे (सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे) यांच्या पत्रकानुसार सदर प्रशिक्षणाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील ज्या शिक्षकांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे याच शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण आहे. सदरील प्रशिक्षण हे ५० ते ६० तासांचे असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण १ जून ते ३० जून २०२२ असा तीस दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपामध्ये एकूण तीस दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थीस त्याच ऑनलाइन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी १२ वर्षांची अर्हताकारी सेवा, या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे, त्यांना विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाइन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे, शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले असले पाहिजे अथवा त्याने, तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे. निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी ४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे. २४ वर्षांची अर्हताकारी सेवा असून त्यांना विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाइन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे. माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त पाहिजे अशी अट आहे.

बातम्या आणखी आहेत...