आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजे जे अनुभव घेत गेलो त्याचाच संवेदनशीलपणे विचार करीत लिहित गेलो. कधीही नियोजन करून कुठलेच काम केले नाही. मी मुक्तपणे माझ्यातील कवी, नाट्यकलावंत, पत्रकार अशा भूमिका जगत आलो आहे. अशा विविध अनुभव कथनातून कवी- पत्रकार, नाट्यकलावंत विनोद जैतमहाल यांनी प्रश्नांची उत्तरे दिलखुलासपणे देत मुलाखतीत रंगत आणली.
शहरातील मुद्रा साहित्य सेवाभावी संस्थेतर्फे कामगार कल्याण केंद्रात ‘निर्मितीच्या शब्दकळा’ या मुलाखत कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. कवी- पत्रकार डॉ. सुहास सदाव्रते यांनी विनोद जैतमहाल यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर, प्रमुख पाहुणे कामगार कल्याण अधिकारी जिज्ञेश पाटील, मुद्रा साहित्य संस्थेचे अध्यक्ष कवी कैलास भाले यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलाखतीत पुढे नाट्यकलावंत जैतमहाल म्हणाले की, भाषा कुठली का असेना, ती संवाद आणि संपर्काचे प्रभावी माध्यम असते. असे सांगून हिंदी, उर्दू आणि संस्कृत भाषेची गोडी कशी लागली हे सांगितले. कवी म्हणून स्वतःला सिद्ध करताना ‘कोरोना भगाऐगे, टीका लगवायेगे ‘या गीताला मिळणारा प्रतिसाद आणि समाज माध्यमांवर घेतली गेलेली दखल यावर अनुभव जैतमहाल यांनी कथन केले. आपल्यातील नाट्यकलावंत घडताना वऱ्हाडकार डॉ. लक्ष्मण देशपांडे, रुस्तुम अचलखांब अशा व्यक्तींचा कसा प्रभाव पडला हे एका प्रश्नांच्या उत्तरादाखल कवी जैतमहाल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर शेळके यांनी केले. कार्यक्रमास प्रा. पंढरीनाथ सारके, श्रीधर अंभोरे, मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेकर, डॉ. यशवंत सोनुने, डॉ. दिगंबर दाते, शांतीलाल बनसोडे, डॉ. राजेंद्र गाडेकर, इंजी. संजय कसबे, इलियास मोहिय्योदीन, प्रा. खेडकर, सुधाकर वाहूळे, लक्ष्मीकांत दाभाडकर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.