आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा रेशीम शेती विकास कार्यालय व राणी उंचेगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने रेशीम शेती कशी आहे, त्यातून काय तयार होते का, याबाबत माहिती देण्यासाठी रेशीम करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात नेऊन प्रत्यक्ष माहिती देऊन धडे देण्यात आले आहेत. प्राथमिक स्तरावर ६० विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करण्यात आले.रेशीम उद्योग विकास अधिकारी अजय मोहिते यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतील एक दिवस शाळेसाठी या उप्रकमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन मघाडे यांनी केले. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणार नाही.
विज्ञान विषय हा फक्त शाळेत पाठ्यपुस्तकातून शिकण्याचा विषय नाही तर त्यातून भविष्यात स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारून इतरांना देखील आपल्याला मदत करता आली पाहिजे. जागाचा पोशिंदा असलेला शेतकरी समृध्द झाल्या शिवाय देशाची प्रगती होणार नाही. शेतीला विज्ञान तंत्रज्ञानाच्या , जोड धंद्याच्या जोडीने जांधे हे शेतकरी लखपती होऊ शकतात तर इतरही असे करू शकतात ही प्रेरणा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी एस. आर. जगताप, केदार, कवानकर आदींनी परिश्रम घेतले आहे. अजय मोहिते यांनी विद्यार्थांना घर नर्सरी मध्ये रोपे तयार करण्याचे मार्गदर्शन केले.
रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्याचेही मार्गदर्शन
रेशीम शेतीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या रोपांचे बेन, आळ्या, कोष विक्री, त्याचे मार्केटिंग, शासनाची योजना, वर्षातून एक एकर मध्ये साडेतीन लाख रुपयांची कमाई शेतकरी कसा करु शकतो याबद्दल माहिती दिली. प्रत्यक्ष रेशीम उद्योग करणारे शेतकरी जंढे, त्यांच्या पत्नी व वडीलांनी मुलांना अनुभव सांगितले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.