आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोमाता:आरोग्य, आनंदासाठी गोमातेची सेवा करा

सेलू8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाने उत्तम आरोग्य, उन्नती तसेच आनंद प्राप्तीसाठी गोमातेची सेवा करावी, असे प्रतिपादन गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांनी शुक्रवारी सेलू येथे एका कार्यक्रमात सांगीतले.

येथील श्री संत गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळेच्या कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, अशोकराव काकडे, उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी,नंदकिशोर बाहेती, मदनलाल करवा, संजयकुमार मेहता, भगिरथ सारस्वत महाराज, शिवम सारस्वत, रतन दायमा, द्वारकादास करवा, हरमनदास करवा, पंकज झंवर, वल्लभ राठी, नंदकिशोर परताणी आदींची उपस्थिती होती. युवकांनी एक दिवस एक तास गौशाळेमध्ये श्रमदान सेवा करावी, प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात गोमाता दर्शनाने करावी. गो ग्रास द्यावा, असे महाराजांनी सांगितले.

या वेळी मोतीलाल भुतडा, रामेश्वर साबू, नंदलाल परताणी, जगदिश भुतडा, सुजित मालाणी, शाम मालाणी, रामेश्वर सोमाणी, राजेंद्र तोष्णीवाल, पंकज सोनी, संतोष काबरा, भिकुलाल कासट,बसवराज शिवणकर यांच्यासह भगवानगुरु, मनोहरगुरु, डॉ.रामाने, डॉ.ज्ञानेश्वर कदम, प्राजक्ता कुलकर्णी, डॉ.सचिन गायकवाड, डॉ. माऊली गात, बालाजी सवणे, लक्ष्मण गायकवाड, बालासाहेब रत्नपारखी, संदीप शेलार, अभिजीत शेलार, सदाशिव अप्पा वाघमारे, नितीन सातपुते आदींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने राधाकृष्ण महाराज यांनी मुक्त संचार गोठा, गोशाळेत गोमातेचे पूजन केले.

प्रास्ताविक शैलश तोष्णीवाल यांनी केले. सूत्रसंचालन भगवान पावडे यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेंद्र करवा, गोविंद शेलार, सुरेंद्र तोष्णीवाल, शिवनारायण मालाणी, अविनाश बिहाणी, सूर्यकांत जाधव, जगन्नाथ पवार, कृष्णा काटे, गणेश बागडे, बबलू दायमा, श्रीनिवास काबरा, अनुप गुप्ता, विजय पांडे, रमेश काला, आनंद सोनी, अशोक शेलार यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...