आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य:सुभाष देवीदान यांचे सेवा- कार्य प्रेरणादायी  : राऊत

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यापार, उद्योगासह शिव जन्मोत्सव, हत्ती रिसाला मिरवणूक अशा सर्व समाजिक कार्यांत अग्रेसर असलेल्या सुभाषचंद्र देवीदान यांचे सेवाकार्य प्रेरणादायी असून त्यांच्या हातून असेच सेवा कार्य घडावे, अशा सदिच्छा मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को- ऑप बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत यांनी व्यक्त केल्या.

अग्रविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑप. बँकेचे संचालक तथा ज्येष्ठ समाजसेवक सुभाषचंद्र देवीदान यांचा सोमवारी बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष अंकुश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात झालेल्या सत्कार सोहळ्यास उपाध्यक्ष मधुसूदन मुत्याल, संचालक गोवर्धन अग्रवाल, अनिल सोनी, नरेश गुप्ता, हेमंत ठक्कर, विरेन रुणवाल, अॅड. प्रवीण लाहोटी, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, जे.पी.सी. बँकेचे संचालक संजय मुथा, सुनील चौधरी, अशोक जोगड, बँकेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांची उपस्थिती होती. अंकुश राऊत म्हणाले, मोतीराम अग्रवाल यांच्यानंतर सुभाषचंद्र देवीदान यांना अग्रविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले ही बाब जालनेकरांसाठी अभिमानास्पदअसल्याचे राऊत यांनी नमूद केले. सुभाषचंद्र देवीदान यांनी सर्वांचे सहकार्य व सदिच्छा आपल्या सोबत असल्याने आपण पुरस्कारास पात्र ठरलो असे सांगितले. सूत्रसंचालन शिरीष देवळे यांनी केले तर हेमंत ठक्कर यांनी आभार मानले. राजेंद्र बजाज यांच्यासह कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...