आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:जीवनात यशस्वितेसाठी आजच ध्येय निश्चित करा

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजच ध्येय निश्चित करावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त अमित घवले यांनी केले. जालना येथील ज्ञानज्योत विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त “मी यशस्वी कसा झालो” या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब बायस तर प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ सचिन झाडबुके, मोटार वाहन निरीक्षक सुमित गीते, मुख्याध्यापक संजय सरकटे, निलेश हिवाळे, किशोर खरात आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे विविध ४०० भित्तीपत्रकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सचिन झाडबुके यांनी विद्यार्थ्यांना यशासाठी सकारात्मक दृष्टीकोन बाळगला पाहीजे असे सांगितले तर सुमित गीते यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल करावी असा संदेश दिला.

बाबासाहेब बायस यांनी अध्यक्षीय समारोपात यशस्वी अधिकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमातुन आपण एखादा गुण घेऊन मेहनत करावी. असे सांगितले. प्रास्ताविक संजय सरकटे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पाटील यांनी तर अनंत झाल्टे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थिती होते.

बातम्या आणखी आहेत...