आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज प्रकरण:प्रलंबित कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढा

भोकरदन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा जमा करण्यात येते. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांनी व्यवसायात भरारी घेण्यासाठी अर्थसाहाय्य करून युवकांना उद्योजक बनविण्यासाठी ही योजना आहे.

परंतु गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे कर्ज प्रकरणे प्रलंबीत आहेत. त्यामुळे तत्काळ जालना जिल्ह्यात तसेच भोकरदन तालुक्यात संबंधित बँका,संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात यावा व प्रलंबीत कर्ज प्रकरणे,व्याज परताव्या साठी येणाऱ्या अडिअडचणी जाणून घेऊन व्याज परतावा लाभार्थ्यांना त्वरित द्या अशी मागणी बळीराजा फाऊंडेशन च्या वतीने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडे नारायण लोखंडे, सचिन थिटे आदींनी केली आहे

बातम्या आणखी आहेत...