आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी जाहीर:जैन संघटनेची सेवलीची कार्यकारिणी जाहीर ; पदाधिकाऱ्यांची जैन स्थानक येथे बैठक

जालना3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जैन संघटना सेवली अध्यक्षपदी आदेश खाबिया तर सचिवपदी स्वप्नील कुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली.भारतीय जैन संघटनेचे पदाधिकाऱ्यांची जैन स्थानक येथे बैठक झाली. अध्यक्षस्थानी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष चंपालाल राका तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब, दिनेश राका, रामनराज संघवी, अभयकुमार कुरकुटे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी प्रकाश कुरकुटे यांनी मंगलाचरण घेतले. त्यानंतर हस्तीमल बंब, राजेंद्र लुंकड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजभूषण सन्मानपत्राने कोमल कुचेरीया, अभयकुमार कुरकुटे यांना गौरविण्यात आले. यावेळी सेवली शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष आदेश खाबिया, उपाध्यक्ष प्रज्योत चोरडीया, सचिव स्वप्नील कुरकुटे, महिला शाखा अध्यक्ष माधुरी मैराळ, उपाध्यक्ष पूजा अक्कर, सचिव प्रियंका कुरकुटे यांचा समावेश करण्यात आला. सुत्रसंचालन डॉ. निर्मल जोगड यांनी केले. यावेळी इंदरचंद चोरडिया, पारस श्रीश्रीमाल, रमेश डोसी, पन्नालाल डोसी, महावीर कुचेरीया, मनोज बोरुंदीया, संतोष डोसी, शुभम अक्कर, सुरेश राका, निखील कुरकुटे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...