आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सेवली आरोग्य केंद्राचा टोपेंकडून गौरव

सेवलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ या वर्षात माता बाल संगोपन कार्यक्रम, कुटुंबकल्याण कार्यक्रम, एचएमआयएम प्रधानमंत्री मातृवंदन योजना, आरोग्यवर्धिनी कार्यक्रम, योगा तसेच कोविड लसीकरणात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवली आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कुलकर्णी, डॉ. कुरेशी यांनी प्रशस्तिपत्र स्वीकारले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...