आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:जलसमाधीचा इशारा देणाऱ्या छावा, शिवसंग्रामच्या सात जणांना अटक

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा जालन्यातील युवकांनी दिला होता. यातील शिवसंग्राम पक्ष आणि छावा संघटनेच्या ८ पदाधिकाऱ्यांना मुंबईत जालना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ देत नाही, तोपर्यंत आम्ही जामीनदेखील करणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे बांधकाम सुरू करावे, सारथी संस्थेला दरवर्षी २०० कोटी निधी द्यावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मराठा पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे अरबी समुद्रात २२ ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू चव्हाण, संतोष वनवे, स्वप्निल भिसे यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...