आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कोदा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून गावाला तत्काळ शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सरपंच आरती काळे यांनी केली आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्याने गावाची नळ योजना बंद आहे. परिणामी ग्रामस्थ व महिला मंडळींना आता रोज दहा रुपये हंड्याप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायत मार्फत आम्ही सर्व कागदोपत्री पूर्तता करून भोकरदन पंचायत समिती कडे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे.
अद्यापपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी महिलांना भटकंती करावी लागत आहे प्रशासनाने वेळेत लक्ष द्यावे व तात्काळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ टँकरच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा. कोदा गावाची लोकसंख्या दोन हजारापर्यंत आहे सर्वांसाठी किमान एक शासकीय टँकरद्वारे तीन फेऱ्यांमध्ये दानापूर जुई धरण येथील शेतकऱ्याची विहीर अधिगृहन करून तेथून पाणीपुरवठा करावा अशी ही मागणी करण्यात आली. कोदा गावासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली असून दानापूर येथून कोदा गावापर्यंत पाईपलाईन चे काम मंजूर झालेले आहे ते काम ही तत्काळ सुरू करावे अशीही मागणी केली आहे.
पाणीप्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच काळे यांनी दिला आहे. दरम्यान, गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी रितसर प्रस्ताव दाखल करण्यात आला असल्याचे ग्रामसेवक महेंद्र साबळे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.