आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना तालुक्यातील मोठया बाजारपेठेचे गाव असलेल्या रामनगरमध्ये स्वच्छतेचा अभाव असून यामुळे ठिकठिकाणी नाल्या तुंबल्या आहे असून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात बहुतांश ठिकाणी नाल्या नाहीत तर काही ठिकाणी आहे तर त्या अरुंद असल्यामुळे नाल्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.
गावातील महत्वाचा रस्ता असलेला हनुमान मंदिर ते झोपडपट्टी या रस्त्यावर कायम सांडपाणी वाहते. महिलांना सार्वजनिक विहिरीवरून पाण्याचे हांडे नेताना सांडपाण्यातून वाट शोधावी लागते. तसेच मानेगाव रोड ते झोपडपट्टी सांडपाण्याच्या नाल्या बंद असून या रोडवरही सांडपाण्याने गटारी तुंबल्या आहेत. यामुळे पादचाऱ्यांच्या अंगावर सांडपाणी उडत असल्यामुळे वादाचे प्रकार होतात.
दैनंदिन स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी नाही तसेच गत पंचवार्षिकमध्ये दलित वस्तीत बसवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या या शोभेच्या वस्तू बनल्या असून ग्रामस्थांना सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे. ग्रामपंचायतच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगाचा निधीतून येत्या आठ दिवसात पंधराव्या वित्त आयोगातून हनुमान मंदिर पासून झोपडपट्टी पर्यंत सांडपाण्यासाठी नवीन अंडरग्राउंड नालीच्या काम सुरु केले जाणार असल्याचे सरपंच अॅड. गोपाल मोरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.