आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या राज्य सरकारमध्ये सावळागोंधळ दिसून येत असून कोणाला तुरुंगात टाकणे, कोणाला आडवा करणे कोणाला मारणे याच बाबी सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. जे करायचे ते करा परंतु गाव गाड्याकडील शेतकऱ्यांकडील बहुजन कडील, गोर गरीब लोकांकडे लक्ष द्यावे अशी आर्त हाक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
वाटूर येथील जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या संवाद दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची उपस्थिती होती. वाटूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमात बोलताना खोत म्हणाले, सरकार अंगात वार भरल्याप्रमाणे वागत आहे. जनतेला दिलेल्या जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. यांचा जाहीरनामा ३०० युनिट वीज मोफत देणे, कर्जमाफी करणे तरुणांच्या हाताला काम देणे, सातबारा सरसगट कोरा करणे, एसटीचे विलगीकरण करणे आदी बाबी असलेला जाहीरनामा विसरले आहे. हे सरकार फक्त पैसा कमवण्याच्या धुंदीत लागलेला आहे.
ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण याच सरकारने नाकर्तेपणामुळे घालवले आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना हा लढा उभा करून या झोपलेल्या सरकारला जाग करावे लागणार आहे. आमदार लोणीकर म्हणाले, आपण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री असताना मागेल त्याला पाणी योजना दिल्या. या सरकारमध्ये चोर चोर भाऊ भाऊ अर्धे अर्धे वाटून खाऊ कोणाला दमडीची ही काम कोणत्याही विभागात कोणत्याही गावात विकास कामे नाहीत असे हे करंटे सरकार सर्व बाबी मध्ये नापास ठरले आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी, रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.