आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेते:शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते म्हणजे शरद जोशी

सिधीकाळेगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकिय पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मत मागतात. निवडून आल्यावर पुन्हा या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. परंतु शरद जोशी यांच्यासारखे शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता पुन्हा होणे शक्य नाही, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णूपंत गिराम यांनी केले.

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील ग्राम पंचायत कार्यालयात शरद जोशी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. सरपंच सुभाष गिराम, माजी सरपंच सखाराम गिराम, ग्रामपंचायत सदस्य भागवत गिराम, जनार्धन गिराम, साळुराम गिराम, सुभाष गिराम, सय्यद हणीप, गोपीनाथ शेळके, जनार्धन भि.गिराम, अंकुश जोगदंड, बाबासाहेब वैद्य, मोकिंदा गिराम, सय्यद उस्मान आदी उपस्थित होते. विष्णुपंत गिराम म्हणाले, शेतीमाला जो भाव पुर्वी होता. तोच भाव आज मिळतो. परंतु शेतीसाठी लागणारे खते, औषधी यामध्ये मोठ्या प्रमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शेती व्यवसाय तरुण शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरू लागला आहे. नवीन प्रयोगामुळे पिकाचे उत्पादन वाढले असले, तरी उत्पन्नात मात्र वाढ झाली नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे. शेतकऱ्यांना फक्त बळीराजा म्हणून होणार नाही, तर त्यांच्या शेतातील मालाचा दर ठरवण्याचा अधिकार जापेर्यंत मिळणार नाही तो पर्यत राज्यातील शेतकरी सुखी आणि समृद्ध होणार नाही. कोरोना महामारीच्या काळात कारखाने, व्यवसाय सर्व व्यवहार ठप्प पडलेले असताना केवळ शेतकरी मात्र सर्वाच पोट भरण्यासाठी शेतात कष्ट करत होता. भाजीपाला पिकवून शहरातील लोकांपर्यत पोहचवत होती. असे सांगितले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष गिराम यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...