आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे सरकार:मंत्री सत्तारांमुळे शिंदे सरकार कोसळेल : आमदार गोरंट्याल

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हा महाराष्ट्राला लागलेला अभिशाप आहे. त्यांच्यामुळे एक दिवस नक्कीच शिंदे सरकारला धोका होईल आणि हे सरकार कोसळेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिपदावरून आणि पक्षातूनही तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.

आमदार कैलास गोरंट्याल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मंत्री सत्तार यांच्यावर तोफ डागत आहेत. सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याचाही आमदार गोरंट्याल यांनी निषेध करित समाचार घेतला. सत्तार हे अशिक्षित असल्यामुळे त्यांना काय बोलावे याचे भान राहत नाहीत. ते कधी कुणाला काय बोलतील याचा काहीच नेम नाही.

त्यामुळेच त्यांनी मागे एका जिल्हाधिकाऱ्याला दारू पिता का म्हणून विचारले होते. शिंदे सरकारने त्यांच्याबाबतीत गांभीर्याने विचार केला नाही तर सत्तार यांच्यामुळेच हे सरकार कोसळेल असेही गोरंट्याल म्हणाले. मंत्री सत्तार ज्यांच्यासोबत राहतात त्यांना नक्कीच धोका होतो. म्हणून त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनीही गांभीर्याने विचार करून त्यांच्यापासून दूर झाले पाहिजे असे गोरंट्याल म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...