आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव पुरस्कार:सतीश उखर्डे यांना शिवछत्रपती गौरव पुरस्कार

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वैजापूर यांच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या उद्देशाने दिला जाणारा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार शिवव्याख्याते सतिष उखर्डे यांना प्रदान करण्यात आला. सतिष उखर्डे हे टेंभूर्णी गावचे भूमिपुत्र असून ते आपल्या सामाजिक कार्यातून,व्याख्यान- प्रबोधनाच्या माध्यमातून चांगले विचार या तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत.

त्यांचे विविध सामाजिक विषयावर/महापुरुषांवर लेख वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहेत. या अगोदरही त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. यावेळी आमदार रमेश बोरनारे, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, प्रमोद जगताप, शिल्पा परदेशी, संजय निकम, बाबासाहेब जगताप, पंकज ठोंबरे, अनुपमा भंडारी, चंदा लहामगे, मोतीभाऊ वाघ, केदार मोटे,अनिल घोडेकर, गणेशराव गाडेकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...