आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलू:‘शिवसैनिकांनी नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहावे’

सेलू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसैनिकांनी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी तयार राहून भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हावे. आपण निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन ठाणे येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

सेलू येथील शिवसंपर्क अभियान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मडवी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवा सेना विस्तारक राहुल लोंढे, नगरसेवक सुभाष साळूके, हर्षवर्धन पाळंदे, नितीन लांडगे, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, राम खराबे पाटील, दिपक बारहाते, रणजित गजमल, मंगल कथले, डख, पवन घुमरे, अतुल डख, मनिष कदम, नाथा खांडेकर, वैभव वैद्य, काशिनाथ घुमरे, संजय साडेगावकर आदींची उपस्थिती होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परिसरातील समस्या व पक्ष संघटनेबाबत ची माहिती करून घेतली. अडीच वर्षाच्या काळात आघाडी शासनाने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी पार पाडावी.

तसेच मतभेद न ठेवता पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. महिलांसाठी देखील शासनाच्या विविध योजना आहेत त्या तळागाळातील महिलापर्यंत पोहोचविण्यासाठी महिला प्रतिनिधींनी मेळाव्याचे आयोजन करावे. बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे सांगितले. यावेळी जिल्ह्यासाठी संपर्कप्रमुख असावा व पालकमंत्री पद शिवसेनेला असावे तालुक्यातील रस्ते, लोअर दुधना प्रकल्पातुन वेगळा कालवा काढणे, औद्योगिक वसाहत, १३२ केव्ही केंद्र, महिलांसाठी रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका हॉल,उपजिल्हारुग्णालय ते निपाणी टाकळी हा रस्ता करणे आदी समस्या यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.

बातम्या आणखी आहेत...