आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेसोबतच राहू, आम्हाला पदाची लालसा नाही. शिवसेना आमचा प्राण आहे. पक्ष संकटात असताना सोडून जाणे ही पक्षासोबत गद्दारी असून दिवंगत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गद्दारी करणे शिकवले नसून स्वाभिमानाने ताठ मानेने जगणे शिकवले आहे, असे आश्वासन देत जाफराबाद तालुक्यातील ३१ पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांमार्फत शपथपत्र भरुन उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले.
उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिक कुंडलिक मुठ्ठे व हरिश्चंद्र म्हस्के यांच्या पुढाकाराने हे शपथपत्र पाठविण्यात आले आहे. जाफराबाद तालुक्यातील ३१ पदाधिकाऱ्यांनी आता आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे शंभर रुपयाच्या बाँडवर लेखी स्वरुपात पत्रच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत शाखा प्रमुख, बूथ प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही तुमच्या सोबत असल्याचे शपथपत्रात म्हटले. कुंडलिक मुठ्ठे, हरिश्चंद्र म्हस्के, बाबुराव मुळे, परमेश्वर सरोदे, छगन तायडे, पांडुरंग नानगुडे, विष्णू जाधव, आण्णा सुतार, ज्ञानदेव बनसोडे, विष्णू लोखंडे, भाऊसाहेब लकडे, दिगंबर जाधव, प्रभाकर लोखंडे, अरुण गुळवे, नंदू गायकवाड, चंदू शिंदे, अमोल म्हस्के, सुरेश पवार, शिवाजी म्हस्के, नंदू म्हस्के, विष्णू म्हस्के, विजय कांबळे, विठ्ठल कोरडे, व्यंकटेश नानगुडे, पाटील बानगुडे, मधुकर जाधव, बळीराम शेजुळ, दत्तात्रय जाधव, मारुती तायडे, विलास शेळके, विष्णू शेजुळ, डिगंबर जाधव, रामदास गायकवाड, सुनील चव्हाण, निलेश देव्हडे, विष्णू जंजाळ, विनोद जाधव, नामदेव नानगुडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.