आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार विरोधात जोरदार निदर्शने:परतुरात शिवसेनेने जाळला ईडीचा प्रतीकात्मक पुतळा

परतूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप करत या कारवाईचा निषेध करण्यासाठी परतुरात शिवसेनेच्या वतीने ईडीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शहरातील महादेव मंदिर चौकात केंद्रातील भाजपा सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्याचे राज्यपाल भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्यासारखे वर्तन करत असून त्यांच्याकडून वेळोवेळी महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. ईडीच्या मदतीने केंद्र सरकार एक प्रकारे दहशत आणि हुकूमशाही पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड यांनी केला आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात रोष निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करत असून या रोषात केंद्र सरकारचा अंत दडलेला असल्याचा घणाघात पुढे बोलतांना तेलगड यांनी केला आहे.

या वेळी तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, शहरप्रमुख दत्ता पाटील सुरुंग, विदुर जाईद, राजकुमार भारुका, अजय देसाई, मधुकर पाईकराव, कांतराव सोळंके, भारत पंडीत, बाबुराव बोरकर, विठ्ठल वटाणे, अजय कदम, रामा सोळंके, माऊली राजबिंडे, नागेश चिखले, उद्धवराव घेमंड, बाळू गाते, गणपत खोसे, सुदर्शन धुमाळ, राहुल कदम, गुलाब नवले, दीपक कदम, भोला पाष्टे, मुकुंद ढवळे, विष्णू जगताप, सोमेश आघाव, तुकाराम राजबिंडे, रोहित अग्रवाल, शेख नूर, शरीफ कुरेशी, संजू पाचारे, विकास खरात, ज्ञानेश्वर बिडवे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...