आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:शिवसेना शिंदे गट जालना तालुका प्रमुखपदी धनंजय पोहेकर यांची नियुक्ती

सिंधी काळेगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील टाकरवन येथील रहिवासी तथा शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते धनंजय पोहेकर याची घनसावंगी मतदारसंघात येणाऱ्या ४२ गावांकरिता ग्रामीण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी केली.

ही नियुक्ती एक वर्षासाठी असून या काळात आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार अणि आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार-प्रसार करून शिवसेना वाढवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे, असे नमूद करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.