आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना:जालना जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे परिवारासोबत राहणार : घोसाळकर

मंठा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवा झेंडा शिवसैनिकांच्या खांद्यावर असून कुणी कुठेही गेले तरी जिल्ह्यातील शिवसेनेला फरक पडत नाही. शिवसैनिकांच्या बळावरच आगामी विधानसभेत जालना जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार निवडून येतील असा विश्वास शिवसेना संपर्कप्रमुख तथा उपनेते विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केला.

मंठा येथील विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयात परतूर - मंठा - नेर - सेवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख तथा माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड, ज्येष्ठनेते अंकुशराव अवचार, माणिकराव थिटे, अजय अवचार, अशोक आघाव, हरिभाऊ पोहेकर, अजय कदम, हरिहर शिंदे, डिगांबर बोराडे, सुदर्शन सोळंके, महेश नळगे, कृतिका भुसारे, गयाताई पवार, बेबीताई पावसे, रुक्‍मीनताई घोडके यांची उपस्थिती होती.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना विनोद घोसाळकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य लोकांना मोठ्या पदापर्यंत पोहोचविले,अठरा पगड जातीच्या सामान्य माणसांना बाळासाहेबांनी सांभाळले, आज जरी शिवसेनेवर संकट आले असले तरी महाराष्ट्रातील संपूर्ण शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शिवसेनेसाठी जालना जिल्ह्यात अनुकूल वातावरण आहे असे घोसाळकर यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. भाजपच्या नेत्यांकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती कुठून आली याचा जाब कोण विचारणार असे त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आगामी काळात विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली.

जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात भाजपवर टीका केली, भाजपने नेहमीच शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगर परिषदांच्या निवडणुकीत भगवा झेंडा फडकावून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला मनोज गांगवे, माजी सभापती संतोष वरकड, सुरेशराव सरोदे, माऊली सरकटे, संजय नागरे, श्रीरंगराव खरात, तुळशीराम कोहिरे, मधुकर काकडे, बाबाराव राठोड, प्रदीप बोराडे, माजी नगराध्यक्ष नितीन राठोड आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...