आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना विजयी:पानशेंद्रा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा सर्व जागांवर विजय; तणावपूर्ण वातावरणात मतमोजणी, गावात दगडफेक

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानशेंद्रा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शिवसैनिकाने विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचा २१ मतांनी पराभव केला. शिवसेनेचे प्रभाकर वामनराव विटेकर यांनी जालना विधानसभा आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झालेल्या मतदानानंतर सायंकाळी या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. या गावात दगडफेकही झाल्याचा प्रकार घडला आहे.

पानशेंद्रा विविध कार्यकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. सकाळ पासूनच तणावपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता या निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. शिवसेनेचे प्रभाकर वामनराव विटेकर यांनी जालना विधानसभा आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी २१ मतांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला. तर दुसऱ्या जागेवर खुल्या प्रवर्गातून संजय खोतकर यांनी गोरंट्याल यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब शंकरराव कवडे, संजय पंडितराव खोतकर, विठ्ठल दादाराव पाचरणे, शालीक नारायण पाचरणे, श्रीमंत रंगनाथ पाचरणे, जनाबाई किसन शिंदे, निवृत्ती दत्तु साबळे, शिवाजी सीताराम साबळे, कौशल्याबाई उत्तम गाडेकर, रुक्मण दामोदर पाचरण, सविता ज्ञानदेव उगले, कौशल्याबाई तानाजी काळे, प्रभाकर वामन विटेकर यांचे जय भवानी शेतकरी विकास पॅनल विजयी झाले आहे.

सकाळपासूनच शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर आणि आमदार कैलास गोरंट्याल हे निवडणूक स्थळी कार्यकर्त्यांसह ठाण मांडून होते. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि शिवसेनेने १३ जागांसाठी पॅनल दाखल केले होते. तर राष्ट्रवादी आणि भाजपाने या निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. या निवडणूकीत दगडफेक व वादावादी होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी तात्काळ मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पाठविण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात आलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे गावाला छावणीचे स्वरुप आले होते. गावात मोठी गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...